श्रीराम!
नामस्मरणात विकारांचा जोर कमी होऊ लागल्यावर सद्विचारही सुचू लागतात. मागे ऐकलेली, वाचलेली उपदेशपर वचने आठवतात आणि बौद्धिक विचाराला त्यांचे साहाय्य होते. उच्च जीवनमूल्यांच्या भूमिकेवरून त्या अडचणीकडे मनुष्य पाहतो, असा प्रभावी व हितकर मानसिक पालट एक दोन तासांच्या नामस्मरणाने तात्पुरता तरी होतोच.
"महत्त्वाची पत्रे देखील मी नेमातून उठल्यावर लिहितो" असे गुरुदेव (रानडे) एकदा म्हणाले. त्याचेही रहस्य हेच होय. नामस्मरण म्हणजे मन-बुद्धीला घातलेले स्नान होय!
~ पूज्य काकासाहेब तुळपुळे यांच्या "डोळस नामसाधन अर्थात आत्मानंदाचा शोध" या पुस्तकातून
जानकी जीवन स्मरण जय जय राम
ReplyDelete