|| सद्गुरूविण जन्म निर्फळ ||
गुरु कृपेशिवाय काहीच शक्य नाही आणि गुरुकृपेने सर्व काही शक्य आहे या एकाच नाण्याच्या दोन बाजू. परमार्थ प्रवासात शिष्याचा हात धरून, वाटेतले खाचखळगे त्यास बोचू नयेत म्हणून त्याला खांद्यावर घेऊन त्याच्यासोबत अविरत प्रवास करणारा दीपस्तंभ म्हणजे गुरु. मी साधन करतो हा अहंकार शिष्यात येऊ नये म्हणून जपणारा गुरु त्याला मुक्कामी पोहोचवे पर्यंत त्याच्यासोबत राहतो. सद्गुरुंशिवाय हा परमार्थ प्रवास केवळ अशक्यच नव्हे तर अत्यंत कष्टदायक देखील. मात्र एकदा सद्गुरूंवर सोपवलं की मात्र तितकाच आनंददायक!

No comments:
Post a Comment