Different Helpful Quotes in the course of Sadhana by Saints that are gathered through listening to discourses, reading and self-assessment by Guru-krupa. (साधकांसाठी वचन संग्रह)
Sunday, May 24, 2020
Wednesday, May 13, 2020
Friday, April 24, 2020
Thursday, April 23, 2020
Wednesday, April 22, 2020
Monday, April 20, 2020
Sunday, April 19, 2020
ऐहिक मूल्ये मनःकल्पित!!
ऐहिक जीवनमूल्ये वस्तुतः मनःकल्पित असतात. त्यांना सत्याचा पाया नसतो. हे विचार साधकाला निश्चित उपयुक्त आहेत. परमार्थ हेच शिकवतो. देवाशिवाय कशालाही जीवनमूल्य म्हणता येणार नाही. या मुख्य जीवनमूल्याच्या प्राप्तीला इतर गोष्टींचा ज्याप्रमाणात उपयोग होतो, तितकेच त्यांना महत्त्व, अधिक नाही. अधिक महत्त्व आपण अस्मितेमुळे देतो. ते देऊ नये, हेच विवेकाचे सांगणे आहे.
असत्य जीवनमूल्यांना महत्त्व देण्याच्या मुळाशी भीती - एकाकीपणाची, आंतरिक पोकळीची - भीती आहे. काही कारणाने मन अस्वस्थ झाले - मित्र चांगला न वागल्याने, कोणी निंदा केल्याने, कार्यात यश न आल्याने - तर आत्मनिरीक्षण केल्यास वरील सत्यता पटते. त्यावेळेपुरते "या गोष्टीमुळे सर्वनाश झाला" अशी वृत्ती भ्रमाने निर्माण होते. काही वेळाने पुनः सर्व पूर्ववत होते. कारण ती वृत्ती भ्रमच असते. तितका काळ मात्र व्यर्थ जातो, दुःख होते. त्याबरोबरच अशा प्रत्येक अनुभवाने तो भ्रम बळावतो;
म्हणून सतत आत्मनिरीक्षण करून, स्वतःची अस्मिताच काढून टाकावी. त्याचे मुख्य साधन नामस्मरण व स्वरूपानुसंधान; त्यावाचून आत्मदर्शन नाही; देहतादात्म्याचा नाश नाही!
~ पूज्य काकासाहेब तुळपुळे (डोळस नामसाधन)

परमार्थ देवाच्या इच्छेने वाढत असतो!!!
"परमार्थाचे परम महत्त्व जाणून उत्कटतेने साधन करणारे साधक आहेत तोपर्यंतच पारमार्थिक उत्साह टिकणे शक्य आहे. म्हणून स्वतःसाठी व (नाम) संप्रदायाच्या प्रेमासाठीही दीर्घकाल, निरंतर, सत्कारयुक्त नामस्मरण करणे हेच प्रत्येक गुरुपुत्राचे कार्य आहे" असे गुरुदेव (रानडे) सुचवीत.
"आपल्यामागे परमार्थ कोण चालवील?" या त्यांना प्रत्यक्ष न विचारलेल्या पण प्रत्येकाच्या अंतरी असलेल्या प्रश्नाला ते महाराजांची एक गोष्ट सांगून उत्तर देत --
श्री अंबुराव महाराज (पू भाऊसाहेब उमदीकर) महाराजांना म्हणाले, "आपण आणखी काही दिवस राहा, नाहीतर परमार्थ कोण चालवील?" महाराजांनी उत्तर दिले, "तुला परमार्थ वाढावा ही उत्कंठा असेल तर खोली बंद करून नामस्मरण करीत बैस, परमार्थ देवाच्या इच्छेने वाढत असतो!!!"
~ पू काकासाहेब तुळपुळे लिखित डोळस नाम साधन या पुस्तकातून

Saturday, April 18, 2020
Friday, April 17, 2020
नामस्मरण म्हणजे मन-बुद्धीला घातलेले स्नान होय!
श्रीराम!
नामस्मरणात विकारांचा जोर कमी होऊ लागल्यावर सद्विचारही सुचू लागतात. मागे ऐकलेली, वाचलेली उपदेशपर वचने आठवतात आणि बौद्धिक विचाराला त्यांचे साहाय्य होते. उच्च जीवनमूल्यांच्या भूमिकेवरून त्या अडचणीकडे मनुष्य पाहतो, असा प्रभावी व हितकर मानसिक पालट एक दोन तासांच्या नामस्मरणाने तात्पुरता तरी होतोच.
"महत्त्वाची पत्रे देखील मी नेमातून उठल्यावर लिहितो" असे गुरुदेव (रानडे) एकदा म्हणाले. त्याचेही रहस्य हेच होय. नामस्मरण म्हणजे मन-बुद्धीला घातलेले स्नान होय!
~ पूज्य काकासाहेब तुळपुळे यांच्या "डोळस नामसाधन अर्थात आत्मानंदाचा शोध" या पुस्तकातून
Thursday, April 16, 2020
Friday, April 10, 2020
Thursday, April 9, 2020
हिय की प्यास बुझत ना बुझाए ||
रामराया आपल्याला वनामध्यें येऊ देत नाही हे पाहून सीतामाई म्हटली, "तुमच्यासह सर्व कष्ट सुखमय आणि तुमच्याशिवाय सर्व सुखोपभोग हे कष्टमय आहेत." सीता ही श्रीरामाची मोठी भक्त होती. पण आपली गोष्ट तशी नाहीं. आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत, आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे! ~ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज
सद्गुरू, फक्त सद्गुरू ---
|| सद्गुरूविण जन्म निर्फळ ||
गुरु कृपेशिवाय काहीच शक्य नाही आणि गुरुकृपेने सर्व काही शक्य आहे या एकाच नाण्याच्या दोन बाजू. परमार्थ प्रवासात शिष्याचा हात धरून, वाटेतले खाचखळगे त्यास बोचू नयेत म्हणून त्याला खांद्यावर घेऊन त्याच्यासोबत अविरत प्रवास करणारा दीपस्तंभ म्हणजे गुरु. मी साधन करतो हा अहंकार शिष्यात येऊ नये म्हणून जपणारा गुरु त्याला मुक्कामी पोहोचवे पर्यंत त्याच्यासोबत राहतो. सद्गुरुंशिवाय हा परमार्थ प्रवास केवळ अशक्यच नव्हे तर अत्यंत कष्टदायक देखील. मात्र एकदा सद्गुरूंवर सोपवलं की मात्र तितकाच आनंददायक!
Mono-ideism -- ध्येयनिश्चिती हाच परमार्थ!!
Krishna says to Arjuna, "व्यवसायात्मिका बुद्धिः एकेह कुरुनन्दन ||" You must first ascertain your path. In the path of devotion, this holds true thousand times more. Unless we decide the goal of our life, we cannot stay affixed to the path given to us by The Guru. But by His grace and our firm resolve, if the goal is fixed, nothing...absolutely nothing can deter us from the path towards the Ultimate Union.
मुंगी होऊनि साखर खावी --
Unless we truly believe, "I am just a passerby, a speck of dust in this huge universe", one cannot reap the love showered by saints. ज्याला बालभाव साधला त्याला सर्व काही साधलं. जो लहान होऊ शकतो, तोच भक्तिमार्गात गुरुमार्गी स्थिर होऊन त्यांचं प्रेम प्राप्त करू शकतो. त्याला वयाची किंवा कसलीच अट नाही. हे झाल्याशिवाय गुरुचरणी चित्ताचा लय संभवत नाही!
Subscribe to:
Comments (Atom)
-
सावधानता हाच परमार्थ! ~ श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज साधनात distractions टाळणे महत्त्वाचे ~ पूज्य बाबा बेलसरे
-
रामराया आपल्याला वनामध्यें येऊ देत नाही हे पाहून सीतामाई म्हटली, "तुमच्यासह सर्व कष्ट सुखमय आणि तुमच्याशिवाय सर्व सुखोपभोग हे कष्...